Friday, December 4, 2009

पांडुरंग गावकर यांना बृहन महाराष्ट्र पुरस्कार


महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृति कार्य संचालनालयाचे उत्कृष्ट वग्मय पुरस्कार जाहिर झालेत। बृहन महाराष्ट्र विभागत पांडुरंग गांवकर यांच्या "नंतर" कविता संग्रहाला सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार जाहिर झाला आहे। रोख २०००० रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण १४ फेब्रुवारी रोजी सांगली येथील विष्णुदास भावे सभागृहात होईल। गांवकर यांच्यासह विश्वास पाटील, डॉ। यशवंत मनोहर, न्या नरेंद्र चपळगावकर, किशोरीताई आमोणकर, कविता महाजन, देवेन्द्र कान्दोलकर यांनाही यंदाचे वांग्मय पुरस्कार जाहिर झालेत।
goan young journalist and famous poet mr. pandurang gaonkar bag bruhan maharashtra sahitya award for his poetry collection book name "nantar"

Saturday, August 22, 2009

Thursday, July 23, 2009

तसे मी करीत नाही काहीच...

तसे मी काहीच करत नाही
हींडण्या शिवाय
मी फ़क्त करत बसतो दीर्घ कविता
हींडता हींडता....काढून वेळ
नुसत्या भानगडी करीत बसतो
हींडता हींडता ... काढून वेळ

तसे मी करत नाही काहीच पोटा साठी
फ़क्त ऑफिसात बडवत बसतो की बोर्ड
पुन्हा तेच हींडणे
हींडता हींडता... काढून वेळ
मग करतो एक कविता
तसे बघायला गेलात तर मी काही करतच नाही
बोसिंग करता येत नाही
की देता येत नाही मेमो
मुळात माझ्या स्वभावात
असे काही बसत नाही
बाकि मी तसे काहीच करत नाही
नको तिथे नाक खुपसून
कपाळी काढतो घाम ...काहींच्या
आणि आपला असतो असाच हींडत...देशावर...
तसे मी काही करतो असे म्हणताच येणार नाही
.......
हो मी आठवनिने करीत असतो
हिंडन्याचे काम
न चुकता

Thursday, July 2, 2009

रौंग नंबर


कोणी एक बापडा

ज्याला नम्बराच गणित कळलं नसेल

त्याच्या डायरीतून तुमचा नंबर

असलेलं पान गळलं नसेल

तो बिचारा तोच नंबर

लावत असतो बूथवरुन

तुमचा मात्र जिव उगाच

जात असतो गुदमरून



एकदा लागला चुकून नंबर

कोमल आवाज मुलीचा

कोण शहाणा खोडून टाकेल?

असा नंबर चुकीचा

मुद्दाम रौंग डायल करून करून

दर खेपेस सॉरी म्हणतो

तुमचा हेलो....त्यांचा हेल्लो

उगाच वाटतो ओळखीचा



रौंग नंबर लावून लावून

काही जूळवू पाहतात नाती

एसेमेस पाठवून उगाच मग

मागू पाहतात माफ़ी

.....

एकदा केला रिप्लाय तुम्ही

त्याचाही मग रिप्लाय येतो

रिप्लाय रिप्लाय मधूनच मग

मैत्रीचा सेतू होतो

टाळला तुम्ही रिप्लाय तर

तुमच्यासाठी बरं असतं

नाहीतर पुढे संकट येतं ते

आईशपथ खरं असतं



एकदा माफ़, दोनदा माफ़

तीसऱ्या वेळी धमकिच द्या

सनसनित एक शिवी

रिसीवर मधून थेट त्याच्या

कानावरच बसू द्या

....

तुमचा एक निर्णय तुम्हाला

मोठ्या कटकटीतून वाचवू शकतो

शिवी शिवाय खरच सांगतो

रौंग नंबरवर

'रामबाण' उपाय नसतो

- मी पाऊस।

Saturday, June 27, 2009

डिअर नाझिया,

तुजे
बंड
जाले
थंड
कोणा
कसो
घालू
दंड?

नग्न
तुजी
जाली
धिंड
कोण
पापी
कोण
षंड?

पुण्य
तुजो
प्राण
सये
........
...................
...................................
कावळओ न्ही
तुका
मोर
स्पर्शी
पिंड
- मी पाऊस।

पावस म्हज्या घरा दारार....

पावस
तुज्या
आंगा खान्द्यार
खेळटा
खेळटा
निसरलो


पावस
तुज्या
गावा माथ्यार
वयता
वयता
विसरलो


पावस
तुज्या
आंगार कसो
दसून
दसून
चितारलो

पावस
तुज्या
हातारुनार
लोळअन
लोळअन
पसरलो

फटोवन म्हाका
पावस तुका
मेळत रावलो
मध्यानिर
काळखात
वेंगेत तुजे गावलो

असो पावस....

पावस
म्हज्या
घरा दारार
भरान
भरान
कोसाळळओ
- मी पाऊस

Friday, June 26, 2009

पावसाची वेळ


पावसाची वेळ झाली
ती आता धावत येईल
भिजुन मग वेड्यासारखी
छत्री म्हणुन जवळ घेईल

काळजातले सुर मग
विणे सारखे वाजतील
कपाळवर ओठ माझे
विटे सारखे टेकतील

मी मग होऊन विठू
क्षणभर उभा राहीन
भिजू नकोस असं म्हणुन
करकचून मीठी घेईन

बघणार झाड़
ही उगाच त्याला दोष देईल
झाड़ही मग बिचारं
जाणून बुजुन आंधळ होईल

पुन्हा उद्या भेटण्यासाठी
हात कमरेवरुन खाली येईल
संध्याकाळ मोर होऊन
पंखही फुलवून घेईल
-मी पाऊस।

Wednesday, June 24, 2009

द जोक ऑफ़ द वीक

बटलू म्हैसुरा गेल्लो पिक्निकेक थय म्हैसूर पेलेसित भोवताना बटलू वचून राजा टीपू सुल्तानाचे खुर्चेर वाचून बसलों
गार्ड = पत्राव हे खुर्चेर बसू नाकात। ही टीपू सुल्तानाची खुर्ची
बटलू = बरे बरे तो आयलो की उठता।

Saturday, June 20, 2009

कुत्रा

मला आदेश पाळन्याची सवय झाली आहे।
मी माझ्या साहेबांची हुजरेगिरी करतो
साहेब टाकतात ते खातो
साहेब पाजतात ते पितो
साहेब मला कधी कधी प्रेमाने डॉगी म्हणतात
कधी कधी कुत्रा म्हणतात
मला जाणीव होत नाही
कुत्रा असल्याची
जेव्हा मेडम धरतात छातीशी
आणि देतात दोन मुका
कधी कधी आनंदाच्या की आणखी कसल्या तरी भरात
मेडम मुकावर मुका घेत राहतात
तेव्हा मात्र मला साहेबांची कीव येते
पण मला त्याची वेळी
आतल्या आत वेदना होतात
फ़क्त मुकाच मार बसल्याने...
साहेब पुढे केव्हातरी माझ्या शेपटीवर पाय ठेवतात
आणि मेडम च्या नकळत कापून टाकतात
हाकलून लावतात घरातून
मी आपला नसलेल्या शेपटीची जागा
हलवत हलवत
हल्का हल्का पेकाटत
आणि मेडमची आठवण काढीत
गल्लीतून धावत सुटतो
परत कधी ह्या घरात
न येण्याचा निर्धार करुन
...






Tuesday, June 16, 2009

मी करत नाही काहीच

तसे मी काहीच करत नाही
हींडण्या शिवाय
मी फ़क्त करत बसतो दीर्घ कविता
हींडता हींडता॥ काढून वेळ
नुसत्या भानगडी
करीत बसतो हींडता हींडता ... काढून वेळ
तसे मी करत नाही काहीच
पोटा साठी फ़क्त ऑफिसात
बडवत बसतो की बोर्ड
पुन्हा तेच हींडणे...
हींडता हींडता काढून वेळ
मग करतो एक कविता
...तसे बघायला गेला तर मी काही करतच नाही
बोसिंग करता येत नाही
की देता येत नाही मेमो
मुळात माझ्या स्वभावात असे काही बसत नाही
बाकि मी तसे काहीच करत नाही
नको तिथे नाक खुपसून
कपाळी काढतो घाम ...काहींच्या
आणि आपला असतो असाच हींडत...देशावर...
तसे मी काही करतो असे म्हणताच येणार नाही
हो मी आठवनिने करीत असतो
हींडण्याचे एक काम... परंपरेने

Friday, June 12, 2009

मिस् कॉल

मिस् कॉल .........
तुम्हाला मिस् कॉल येतो
म्हणजे नेमकं काय होतं
या स्वार्थी जगामध्ये
एटलिस्ट कोणीतरी मिस् करतं ....

करत असाल इतरांना डिलीट
तुम्ही तुमच्या रुदयातुन
तरीही तुमचा नंबर कोणी
शोधत असतो लिस्टातुन ....

उगाच मिस् कॉल पाहून तुम्ही
दिल्या असतील शिव्या दोन
पलिकडला मात्र हसून हसून
पुन्हा पुन्हा करतो फोन ...

नकोच कटकट म्हणुन तुम्ही
फ़ोन करता सायलंट
मिस् करणार्या मित्रांना टाकुन
उगाच होता वायलंट ...

उचला फोन
आठवा त्याला
पठावा एक एसेमेस
फसवून फसवून मीस कॉल
आणि एक एमेमेस
बघा मित्राला सतवन्या मध्ये
कितके असते समाधान
त्याच्या मनात वाढतो नकळत
आणखी थोड़ा तुमचा मान .....

- पांडुरंग गावकर

Tuesday, April 7, 2009

नंतर पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ दासू वैद्य आणि इतर मान्यवर

'नंतर' प्रकाशन करताना जेष्ठ कवि डॉ दासू वैद्य, कवि विष्णु वाघ, गोवा चेंबर ऑफ़ कामर्स चे अध्यक्ष्य, उद्द्योजक नितिन कुंकलेकर, प्रसाद लोलयेकर, राजेंद्र केरकर, सद्गुरु पाटील, अनंत साळकर आणि कवि पांडुरंग गावकर



कवि पांडुरंग गावकर










डॉ दासू वैद्य

Sunday, February 22, 2009

तूं निष्पर्ण रुख

चुरगळील्ली वस्त्रां
फान्तोडेर
जेन्ना तिड़किन म्हजेर उडोवन
तूं निष्पर्ण रुख जावन न्हाता
तेन्ना जाणीव जाता महका
की तूं आनी तूंच म्हजी पूर्ण
उतरा उतरान्त्ल्यान
शोवाराच्या थेम्बा थेम्बात्ल्यान
फान्तोडेचे ठंडेक शर्म येतली इतले तूं थंड जाता .... बर्फा भशेन
बर्फाचिच माळउन मोतया
निष्पर्ण रुखार तूं परत म्हजेच वेंगेत येवन
झडयता रुखावयली मोतया
आनी घर भर करता मोतयाच मोतया
मोतयाच मोतया

Saturday, February 21, 2009

झांटे कोंलेज १० वे युवा साहित्य सम्मलेन

संमेलनात उलयताना फामाद कोंकणी कवियत्री श्रीमती नयना आडारकार कुशिक हेर मानेस्त

Thursday, February 19, 2009

डायरी

नव्या कोर्र्या डायारिवर
लिहिताना उगाचच हायसे वाटते
पण नव्या कोर्र्या कागदावर
काळी शाही नाते सांगत भेटते

दोघांच कसं
अनामिक नातं
पानभर शब्दात
कोण कोण गातं

नव्या कोर्र्या डायरिवर
नव कोरं नातं
क्यान्व्हास्वर आपलं मन
रांगत रांगत जातं

नव्या कोर्र्या डायरिवर
कोणी टाकतात मोती
मोतिच ते
कही काफ्फल्लक माझ्यासारखे
कविता लिहित राहतात
पाठीवर पडतो धपाटा
आणि गुरूजी म्हणतात
हे काय गाढवा कोम्बडेचे पाय

कोर्र्या कोर्र्या डायरिवर
आम्ही कोम्ब्डेचेच काढतो पाय
आणि मनातल्या मनात म्हणतो
कविता शाही हाय हाय ......हाय हाय

कवितेचे गाव

कवितेच्या गावाला
नसतो पत्ता
नसतो पिनकोड
असतो फ़क्त
आकार
जो
कवीच्या मनाप्रमाणे
कायमचा बदलत असतो
कवीला हवा तसा आणि हवा तेव्हा
कवितेच्या गावाला असला आकार तरी नसते सीमा
कारण सिमेच्या बन्धनात राहु शकत नाही
कविता आणि कविही


Wednesday, February 18, 2009

झांटे कोलेज १० वे युवा साहित्य सम्मलेन


poet meet (kavi sammelan) held in zantye collage on occasion of 10th konkani yuva sahitya sammelan on saturday 14th february 2009. meet preside by maya kharangate. pandurang gaonkar,reshma surlakar, chetan acharya, karn khandeparkar,dilip dhargalkar has present the several poems.