Saturday, June 20, 2009

कुत्रा

मला आदेश पाळन्याची सवय झाली आहे।
मी माझ्या साहेबांची हुजरेगिरी करतो
साहेब टाकतात ते खातो
साहेब पाजतात ते पितो
साहेब मला कधी कधी प्रेमाने डॉगी म्हणतात
कधी कधी कुत्रा म्हणतात
मला जाणीव होत नाही
कुत्रा असल्याची
जेव्हा मेडम धरतात छातीशी
आणि देतात दोन मुका
कधी कधी आनंदाच्या की आणखी कसल्या तरी भरात
मेडम मुकावर मुका घेत राहतात
तेव्हा मात्र मला साहेबांची कीव येते
पण मला त्याची वेळी
आतल्या आत वेदना होतात
फ़क्त मुकाच मार बसल्याने...
साहेब पुढे केव्हातरी माझ्या शेपटीवर पाय ठेवतात
आणि मेडम च्या नकळत कापून टाकतात
हाकलून लावतात घरातून
मी आपला नसलेल्या शेपटीची जागा
हलवत हलवत
हल्का हल्का पेकाटत
आणि मेडमची आठवण काढीत
गल्लीतून धावत सुटतो
परत कधी ह्या घरात
न येण्याचा निर्धार करुन
...






Tuesday, June 16, 2009

मी करत नाही काहीच

तसे मी काहीच करत नाही
हींडण्या शिवाय
मी फ़क्त करत बसतो दीर्घ कविता
हींडता हींडता॥ काढून वेळ
नुसत्या भानगडी
करीत बसतो हींडता हींडता ... काढून वेळ
तसे मी करत नाही काहीच
पोटा साठी फ़क्त ऑफिसात
बडवत बसतो की बोर्ड
पुन्हा तेच हींडणे...
हींडता हींडता काढून वेळ
मग करतो एक कविता
...तसे बघायला गेला तर मी काही करतच नाही
बोसिंग करता येत नाही
की देता येत नाही मेमो
मुळात माझ्या स्वभावात असे काही बसत नाही
बाकि मी तसे काहीच करत नाही
नको तिथे नाक खुपसून
कपाळी काढतो घाम ...काहींच्या
आणि आपला असतो असाच हींडत...देशावर...
तसे मी काही करतो असे म्हणताच येणार नाही
हो मी आठवनिने करीत असतो
हींडण्याचे एक काम... परंपरेने