Friday, June 12, 2009

मिस् कॉल

मिस् कॉल .........
तुम्हाला मिस् कॉल येतो
म्हणजे नेमकं काय होतं
या स्वार्थी जगामध्ये
एटलिस्ट कोणीतरी मिस् करतं ....

करत असाल इतरांना डिलीट
तुम्ही तुमच्या रुदयातुन
तरीही तुमचा नंबर कोणी
शोधत असतो लिस्टातुन ....

उगाच मिस् कॉल पाहून तुम्ही
दिल्या असतील शिव्या दोन
पलिकडला मात्र हसून हसून
पुन्हा पुन्हा करतो फोन ...

नकोच कटकट म्हणुन तुम्ही
फ़ोन करता सायलंट
मिस् करणार्या मित्रांना टाकुन
उगाच होता वायलंट ...

उचला फोन
आठवा त्याला
पठावा एक एसेमेस
फसवून फसवून मीस कॉल
आणि एक एमेमेस
बघा मित्राला सतवन्या मध्ये
कितके असते समाधान
त्याच्या मनात वाढतो नकळत
आणखी थोड़ा तुमचा मान .....

- पांडुरंग गावकर

3 comments:

L_Ferns said...

I totally agree with this poem and i really liked it very much.
But what about wrong numbers, people who keep giving missed calls who are not friends. I would really like to read a poem about this....:)

यती said...

apratim

यती said...

apratim