Thursday, July 2, 2009

रौंग नंबर


कोणी एक बापडा

ज्याला नम्बराच गणित कळलं नसेल

त्याच्या डायरीतून तुमचा नंबर

असलेलं पान गळलं नसेल

तो बिचारा तोच नंबर

लावत असतो बूथवरुन

तुमचा मात्र जिव उगाच

जात असतो गुदमरून



एकदा लागला चुकून नंबर

कोमल आवाज मुलीचा

कोण शहाणा खोडून टाकेल?

असा नंबर चुकीचा

मुद्दाम रौंग डायल करून करून

दर खेपेस सॉरी म्हणतो

तुमचा हेलो....त्यांचा हेल्लो

उगाच वाटतो ओळखीचा



रौंग नंबर लावून लावून

काही जूळवू पाहतात नाती

एसेमेस पाठवून उगाच मग

मागू पाहतात माफ़ी

.....

एकदा केला रिप्लाय तुम्ही

त्याचाही मग रिप्लाय येतो

रिप्लाय रिप्लाय मधूनच मग

मैत्रीचा सेतू होतो

टाळला तुम्ही रिप्लाय तर

तुमच्यासाठी बरं असतं

नाहीतर पुढे संकट येतं ते

आईशपथ खरं असतं



एकदा माफ़, दोनदा माफ़

तीसऱ्या वेळी धमकिच द्या

सनसनित एक शिवी

रिसीवर मधून थेट त्याच्या

कानावरच बसू द्या

....

तुमचा एक निर्णय तुम्हाला

मोठ्या कटकटीतून वाचवू शकतो

शिवी शिवाय खरच सांगतो

रौंग नंबरवर

'रामबाण' उपाय नसतो

- मी पाऊस।

1 comment:

L_Ferns said...

..............oh my god!!!!!!!!

tis is exactly like what i experienced!!!!
wow......... loved it! Thank you so much!