Tuesday, July 13, 2010

"spandan" the poetry collection book of pournima kerkar,s released (पौर्णिमा केरकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन )



प्रसिद्ध कवयित्री पौर्णिमा राजेंद्र केरकर यांच्या 'स्पंदन' कविता संग्रहाचे प्रकाशन माजी वाहतूक मंत्री पांडुरंग राउत यांच्या हस्ते झाले। कला आणि संस्कृति खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्य स्थानी होते।

Friday, May 7, 2010

'नंतर' ला कवी 'बी' पुरस्कार


पांडुरंग गांवकर यांना कवी 'बी' पुरस्कार
पणजी:, दी, ७ (प्रतिनिधि)-
गोमंतकीय युवा कवी पांडुरंग गावकर यांच्या 'नंतर' या कविता संग्रहाला अकोला येथील अंकुर साहित्य संघ या संस्थेतर्फे महाराष्ट्राबाहेरिल कवीला दिला जाणारा कवी 'बी' हा साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
नंतर पुस्तकाला याआधी गोमंत विद्या निकेतानाचा साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचा वाग्मय पुरस्कार प्राप्त झाला असून हा सलग तीसरा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला आहे.
या आधी अंकुर साहित्य संघाचे पुरस्कार प्रकाश क्षीरसागर आणि रमेश वंसकर या गोमंतकीय कवींना प्राप्त झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण ८ में रोजी जळगांव येथील कुन्हा ककोडा येथील मुक्ताई नगर येथे होत असलेल्या ४६ व्या अंकुर साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.

Saturday, March 20, 2010

'नंतर' ला गोमन्त विद्या निकेतनचा पुरस्कार


पांडुरंग गावकर यांच्या 'नंतर ' कविता संग्रहाला यंदाचा गोमन्त विद्या निकेतनचा साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे।
२१ मार्च रोजी विद्या निकेतनच्या ९८ व्या वर्धापनदिनी पुरस्काराचे वितरण होणार आहे।

Friday, February 12, 2010

'घंटा' ...वेलंटायन (डे) ची

एकमेकाच्या तोंडातले जंतु चिरडून मारू
जिभेवर जीभ घासु, ओठ फुटतील इतके तापऊ
हात घुसतिल तिथे घुसऊ,
निसर्ग संवर्धनाच्या नावाने
झुडपांची वाट लावू
लावू एकेमेकला ...... सावलीचा लळा
आड़ पडू एकमेकाला सारीत दूर
..... च्या मायला इतके सारे करायला
१४ फेब्रुवारिची पहिली वाट
आणि तासभर दोघांचा तंटा
च्या मारी वेलंटाईन डे चा ****