Friday, June 26, 2009

पावसाची वेळ


पावसाची वेळ झाली
ती आता धावत येईल
भिजुन मग वेड्यासारखी
छत्री म्हणुन जवळ घेईल

काळजातले सुर मग
विणे सारखे वाजतील
कपाळवर ओठ माझे
विटे सारखे टेकतील

मी मग होऊन विठू
क्षणभर उभा राहीन
भिजू नकोस असं म्हणुन
करकचून मीठी घेईन

बघणार झाड़
ही उगाच त्याला दोष देईल
झाड़ही मग बिचारं
जाणून बुजुन आंधळ होईल

पुन्हा उद्या भेटण्यासाठी
हात कमरेवरुन खाली येईल
संध्याकाळ मोर होऊन
पंखही फुलवून घेईल
-मी पाऊस।

No comments: