तसे मी काहीच करत नाही
हींडण्या शिवाय
मी फ़क्त करत बसतो दीर्घ कविता
हींडता हींडता॥ काढून वेळ
नुसत्या भानगडी
करीत बसतो हींडता हींडता ... काढून वेळ
तसे मी करत नाही काहीच
पोटा साठी फ़क्त ऑफिसात
बडवत बसतो की बोर्ड
पुन्हा तेच हींडणे...
हींडता हींडता काढून वेळ
मग करतो एक कविता
...तसे बघायला गेला तर मी काही करतच नाही
बोसिंग करता येत नाही
की देता येत नाही मेमो
मुळात माझ्या स्वभावात असे काही बसत नाही
बाकि मी तसे काहीच करत नाही
नको तिथे नाक खुपसून
कपाळी काढतो घाम ...काहींच्या
आणि आपला असतो असाच हींडत...देशावर...
तसे मी काही करतो असे म्हणताच येणार नाही
हो मी आठवनिने करीत असतो
हींडण्याचे एक काम... परंपरेने
Tuesday, June 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment